मी फुटबॉल मैच बघतो...
फुटबॉल
मैच चालू होता. चैनल 1 वर, नेहमीप्रमाणे,
संध्याकाळी, प्राइम
टाइम मधे. आणि काय! स्पार्ताक आणि सेस्का ( सेस्का- सेंट्रल स्पोर्ट्स क्लब ऑफ
आर्मी – रशियाचा फार जुना क्लब) ह्यांच्यामधे सामना होणार होता! आमच्या रशियन
चैम्पियनशिपचा सर्वांत इम्पॉर्टेन्ट मैच!
“लुझ्निकी”
स्टेडियम गच्च भरलं होतं.
मैच
सुरूं होण्यापूर्वी जवळ-जवळ अर्धा तास वेगवेगळे इंटरव्यूज़ दाखवंत होते, जर्नलिस्ट्स
मैचचा परिणाम काय होईल ह्याचा अंदाज लावत होते आणि टीम्सबद्दल चर्चा करंत होते –
म्हणजे, मूड एकदम फुटबॉल-फ़ेस्टिवलसारखा होता.
मी
खूप लक्ष देऊन टेलिकास्ट बघंत होतो आणि मैच सुरू होई पर्यंत मी ठरवूं शकलो नव्हतो
की मी कुणाच ‘फैन’ होईन. पण मग,
मी स्पार्ताकची टीम निवडली, कारण
मी ‘स्पार्ताक’च्या एका जुन्या,
प्रसिद्ध खेळाडू – फ़्योदोर
चेरेन्कोवला ओळखंत होतो. आणि मला लगेच आठवलं की फ़्योदोर कित्ती वन्डरफुल माणूस आहे, इतका
छान कोणीच माणूस असूं शकंत नाही, आणि मला वाटलं की ‘स्पार्ताक’चा फैन होणं माझं कर्तव्यंच आहे! आणि शिवाय,
तो देशभरांत अत्यंत प्रसिद्ध आहे.
कॉमेन्टेटरने
टी.वी.च्या दर्शकांना ‘हैलो’ म्हटलं, आणि खेळ सुरू झाला. बरोब्बर तीन मिनिटांवर ‘स्पार्ताक’च्या
स्ट्राइकरने ‘सेस्का’च्या गोल-कीपर अकीन्फ़ेयेवला गंभीर दुखापत केली.
अकीन्फ़ेयेव गवतावर पडला होता आणि पीडेमुळे तडफडंत होता. स्ट्रेचर आणले गेले. ‘सेस्का’च्या
गोल-कीपरला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करूं लागले. पण ‘स्पार्ताक’चा स्ट्राइकर जवळंच उभा राहून नुसतां बघंत होता, त्याला
अकीन्फ़ेयेवबद्दल येवढीशीसुद्धां दया वाटंत नव्हती. उलट,
तो हसण्याचा बेतातंच होता!
मी
पण हाच विचार करंत होतो. जर ‘स्पार्ताक’चे स्ट्राइकर्स इतके दुष्ट आहेत, तर
मी ‘स्पार्ताक’चा फ़ैन नाहीं होणार. बिचारा गोल कीपर इतका तळमळतो आहे, त्याला
इतकी गंभीर दुखापत केली आणि ह्याच्या मनांत जरासुद्धां सहानुभूति नाहींये!
मी
‘सेस्का’चांच फैन होईन.
पण
तेवढ्यांत आणखी एक नाटक झाले. टी.वी.वर ज़ख़्मी अकीन्फेयेवला स्ट्रेचर वर बाहेर घेऊन
जातानाचे हाइलाइट्स दाखवत होते, आणि तो कसा ओरडंत होता हे ऐकायला सुद्धां मजा येत
होती. तो ओरडून-ओरडून ‘स्पार्ताक’च्या स्ट्राइकरला इतक्या भयानक शिव्या देत होता, की
त्या मी इथे लिहूं देखील शकत नाही. पुस्तकांमधे असले शब्द छापंत नाही. ‘सेस्का’चा
ज़ख्मी गोल कीपर बरांच वेळ, मोठ्याने ओरडून आणि खूप प्रयत्न करून सांगत होता की तो, म्हणजे
स्ट्राइकर, ज्याने त्याला इजा केली होती, खरं
म्हणजे कोण आहे, आणि त्याचे सगळे नातेवाईक,
मित्र आणि ओळखीचे लोकं कोण आहेत आणि
त्याने धमकी दिली की सर्वांना जिवंतच जमीनीत पुरून टाकेल!
नाही, मी
विचार केला, असल्या टीमचा फैन मी नाही होणार, जिचा
गोल कीपर इतका दुष्ट आहे. मी ‘स्पार्ताक’चांच फ़ैन राहीन. आणि चेरेन्कोव मस्त माणूस आहे आणि, तसं
पण, कोणी इतक्या घाणेरड्या शिव्या देऊंच कसा शकतो!
तेवढ्यांत
‘स्पार्ताक’ने गोल केला. वेल्लितन आणि दुसरे स्पार्ताकियन्स आनंदाने ग्राऊण्डच्या बाउन्ड्रीजवळ डान्स
करूं लागले. आह, कित्ती घाणेरडेपणाने ते डान्स करंत होते! फक्त भयानक
आरडा-ओरड! खूपंच कृत्रिम उत्साहाने.
त्यांचा
आनंद लवकरंच वेडेपणापर्यंत पोहोचला. त्यांनी आपले टी-शर्ट्स काढून फेकले, शॉर्ट्स
खाली सरकवले – म्हणजे, काहीतरी खूपंच भयानक घडंत होतं. ‘स्पार्ताक’च्या
फैन्सच्या गैलरीला सुद्धां वेड लागलं होतं,
आणि मग त्यांनी मशाली पेटवल्या, त्यांच्यातून
इतका धूर निघूं लागला की ग्राऊण्ड सुद्धां दिसंत नव्हतं. कॉमेन्टेटरने हेच
सांगितलं : “ग्राऊण्ड नीट दिसंत नाहीये,
कॉमेन्ट्री करणं खूप कठीण आहे.”
मग
स्पार्ताकियन्स ‘सेस्का’च्या फैन्सच्या गैलरीजवळ गेले आणि तोंडं वेडेवाकडे
करून चिडवायला लागले. असं होत राहिलं.
‘नाहीं,’ मी विचार केला,
मी ‘सेस्का’चांच फैन राहीन,
तेच जास्त चांगलं आहे. तसं पण
अकीन्फ़ेयेव ज़ख़्मी झाला होता, आणि ‘सेस्का’च्या खेळाडूंनी आपले शॉर्ट्स खाली नव्हते सरकवले.
पण
वीस मिनिटांतच वेगळंच झालं. खरं सांगायचं तर पुष्कळश्या फुटबॉलप्रेमींच्या मते
काही विशेष घडलंच नाही, पण मी जे काही बघितलं,
त्याचा माझ्यावर खूपंच परिणाम झाला.
‘सेस्का’च्या चीफ-ट्रेनरला टी.वी.वर दाखवंत होते. त्याला
चांगलंच माहीत होतं की त्याला टी.वी.वर दाखवतांत आहेत,
पण त्याने काही फरक नाही पडला, आणि
त्याने सर्वांच्यासमोर मोठ्याने नाक शिंकरलं,
ते पण थेट त्या सुंदरश्या आणि विशेष
प्रयत्न करून बनवलेल्या ट्रेड मिलवर, जिच्यावर तो उभा होता. मला खूप राग आला. असं करतांत
कां?! कमीत कमी रुमालंच काढला असता! पण, हा
तर सरळ ट्रेड मिलवर! नाही, मी ‘सेस्का’चा फैन नाही होणार. ‘स्पार्ताक’चाच फैन राहीन. कमीत कमी त्यांचा ट्रेनर तरी स्वच्छ
आहे...
मग
‘सेस्का’ने सुद्धां एक गोल केला. आणि ‘सेस्का’च्या
खेळाडूंनी खूपंच सभ्यतेने आपला विजय साजरा केला. त्यांनी, सांगायचं
म्हणजे, आपले जर्सी-जैकेट्स नाही काढून फेकले. पण ‘स्पार्ताक’चे
फैन्स, स्पष्ट आहे,
की ‘सेस्का’च्या खेळाडूंवर चिडून आणखी जास्त मशाली पेटवूं लागले
आणि वरून ग्राऊण्डवर टॉयलेट-पेपरचे रोल्स फेकूं लागले.
“आह, हे
कित्ती घाणेरडं आहे,” कॉमेन्टेटरने कुरबुरंत म्हटलं, “’स्पार्ताक’च्या फैन्सचं हे असलं वागणं! मित्रांनो, ग्राऊण्डवर
टॉयलेट-पेपर फेकणं!”
वाद
घालायचा प्रश्नंच नव्हता, मला कॉमेन्टेटरचं म्हणणं पूर्णपणे पटंत होतं! नाही, मी
‘सेस्का’चाच फैन होईन. त्यांचे फैन्स कमीत कमी टॉयलेट-पेपर्सतर
ग्राऊण्डवर नाही फेकंत!
पण, दुसरीकडे, फ़्योदोर
चेरेन्कोव – कित्ती चांगला माणूस आहे... आणि कदाचित ‘स्पार्ताक’च्या स्ट्राइकरला मैचच्या सुरुवातीला ‘सेस्का’च्या
गोलकीपरला जखमी नव्हतं करायचं...तरी पण ‘स्पार्ताक’चाच फैन राहीन...
की
‘सेस्का’चा?
त्यानंतर
‘सेस्का’ने आणखी एक गोल बनवला. ‘स्पार्ताक’ने हा गोल लगेच उतरवून टाकला, आणि
मैच 2:2च्या स्कोरने संपला.
थैन्क्स
गॉड! चला, शेवटी एकदांचा संपला तरी! थैन्क्स,
की नाक खाली नाही झालं. नाहीं तर मला ठरवतांच नसतं आलं की मला कोणाचा फैन व्हायला
पाहिजे, आणि शेवटी दुःख व्हायला पाहिजे की आनंद झाला पाहिजे!
मैच
संपल्याबरोबर मला न्यू क्वार्टर्सच्या तोल्या लूकोवने फोन केला. न्यू क्वार्टर्स
हल्लीच बनवले आहेत, ट्रामच्या थांब्याच्या मागे.
“सेरी, तू
कुणाचा ‘फैन’ होता?” त्याने विचारलं.
आणि
तोल्यातर फुटबॉलचा इतका शौकीन आहे की जगांत त्याला फुटबॉलशिवाय दुसरं काही दिसतंच
नाही. मोठा होऊन फुटबॉल प्लेयर व्हायचंय त्याला आणि तो स्पोर्ट्स-स्कूल ‘स्मेना’मधे
शिकतोय.
“तोल्यान,” मी प्रामाणिकपणे सांगितलं,
मला कळंत होतं की ह्याचा परिणाम काहीही
होऊं शकतो, “प्लीज़, मला येवढं सांग की ते सगळे तिथे थुंकत कां होते, टॉयलेट-पेपर्स
कशाला फेकंत होते, पैन्ट्स कां खाली सरकवंत होते? फुटबॉलच्या
गेममधे असं सगळं होत असतं कां?”
“काय
म्हणतोयं!!!” तोल्या रागाने किंचाळला. “कित्ती उत्कृष्ट खेळ होता! हे थुंकणं कुठून
आलं? तुझं डोकं तर नाही फिरलंय?
आता मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही.
तुला फक्त बैले बघायला पाहिजे, फुटबॉल नाही!” आणि त्याने रिसीवर ठेवून दिला.
मी
पण हाच विचार करतोय, की खरंच बैले पाहणं जास्त चांगल असेल. तिथे कोणी धूर
तर नाही करणार. बैले, कदाचित, चांगली गोष्ट आहे. फक्त एकंच गोष्ट, जी
मला त्यांत आवडंत नाही, ती अशी की सगळी मुलं घट्ट विजारी घालून उड्या मारतात.
ते मला नाहीं आवडंत. आणि जोकर सुद्धा! त्यांना साधारण विजार घालतांच येत नाहीं!
माझं प्रेम...
ही
त्या उन्हांळ्याची गोष्ट आहे, जेव्हां मी आणि तान्या पद्गरदेत्स्काया कम्पाऊण्डमधे
एकत्र हिंडायचो आणि तान्या मला सील-मासा (अस्ताव्यस्त,
बोजड मुलाला सील-मासा
म्हणून चिडवतांत- अनु.) म्हणायची,
आणि हे बघून खूप हसायची की मला
सील-माश्या सारखे असण्याबद्दल आश्चर्य वाटतं.
एका
संध्याकाळी आम्हीं लग्न करायचं ठरवलं. हे तर स्पष्टंच होतं की आमचं एकमेकांवर खूप
प्रेम आहे, पण आम्हांला हे सुद्धां नक्की माहीत होतं की आमचे
आई-वडील ह्या लग्नासाठी कधीच तयार होणार नाही. कारण असं आहे, की
माझी मम्मा शहरातल्या एका इन्स्टीट्यूटमधे लिटरेचरची टीचर होती आणि म्हणून
तान्याचे मम्म-पापा तिला ‘बुद्धिजीवी’
म्हणून शिव्या द्यायचे. ह्या शब्दाचा
नेमका अर्थ काय आहे – हे तर मला कळंत नव्हतं,
पण मला येवढं नक्की माहीत होतं की
तान्याचे आई-वडील माझ्या मम्माशी दोस्ती करण्याऐवजी स्वतःला गळफास लावून घेतील.
माझे पापा पण तान्याच्या आई-वडिलांबद्दल अशा-अशा गोष्टी सांगायचे, ज्यांना
साधारण पुस्तकांत लिहितां येत नाही, आणि कळंत नव्हतं की ते मम्माची बाजू घेताहेत, की
त्यांनासुद्धां तान्याचे आई-वडील आवडंत नाहीं.
म्हणजे, आमच्या
समोर फक्त एकंच मार्ग होता. घरांतून पळून जाण्याचा.
मला
आमच्या बिल्डिंगच्या मागच्या बागेत एक गुप्त ठिकाण माहीत होतं, जो
पर्यंत हिवाळा सुरू नाही होत, आम्हीं तिथे राहूं शकत होतो. पुढचं पुढे बघता येईल.
“तर, तान्,” मी आपल्या वाग्दत्त वधूला विचारलं, “तू माझ्याबरोबर नेहमीसाठी राहायला तयार आहेस कां –
सुखांतही आणि दुःखांतही?”
“ठीक आहे, काहींच प्रॉब्लेम नाहीं,”
तान्या पदगरोदेत्स्कायाने गंभीरपणे
उत्तर दिलं.
आणि
आम्हीं निघालो.
आम्हीं
त्या गुप्त ठिकाणावर पोचलो, आणि लगेच पाऊस सुरू झाला. विजा कडकडू लागल्या, जमीन
हलूं लागली, कदाचित भीतीमुळे असेल किंवा आनंदामुळे सुद्धां असेल.
आणि आम्हीं एकमेकाला चिकटून बसलो होतो, एका मोठ्या खुंटावर जे एका झाडाला करवतीने कापल्यावर
शिल्लक उरलं होतं किंवा कदाचित झाडंच तसं तुटलं होतं.
“तान्,” मी म्हटलं, “ तू समजून घे की तुझ्यासाठी मी माझां जीवनाचं बलिदान
सुद्धां द्यायला तयार आहे!”
“ते
ठीक आहे रे, पण, जर तू आपल्या जीवनाचं बलिदान दिलं तर माझ्याकडे कोण
लक्ष देईल? माझंतर आता तुझ्याशिवाय दुसरं कुणीही नाहीये!”
“अगं, नाहीं, मी
लक्ष ठेवीनंच, पण खरंच, जर गरज पडली तर जीवनाचे बलिदान सुद्धां देईन!”
“ऐक,” तान्याने जोरदार आवाजांत म्हटले, “तू एकदम मूर्ख आहेस! तुला फक्त जीवनाचं बलिदान
द्यायचीच तलफ़ आली आहे, पण कशासाठी –
ह्याला तू महत्व देत नाहीये!”
“खरं
आहे,” मी पट्कन सहमति दाखवली. “मग नाही देणार बलिदान. चौराण्यंव
वर्षे जगेन, पणजीआजी सारखा,
आणि जो पर्यंत सगळ्यांची अंतक्रिया
करंत नाही, तोपर्यंत नाही मरणार.”
“आता
कसं बोलला,” तान्या हसली.
थोडा
वेळ आम्ही, एखाद्या फालतू फिल्मच्या नायक-नायिकेसारखे,
एकमेकाच्या पाठीला पाठ टेकून, चुपचाप, पिसाट पावसांत भिजत बसलो होतो. मग तान्याने म्हटले:
“ऐक, मला
थोडी थण्डी वाजतेय.”
“आणि
मला पण,” मी म्हटलं.
आम्ही
आणखी थोडा वेळ चुपचाप राहिलो. नंतर मी म्हटलं:
“ऐक
तान्, चल प्रॉमिस करूं या की आज पासून बरोब्बर तेरा
वर्षानंतर, जेव्हां आपण अठरा वर्षाच झालेले असूं, तेव्हां
आपण ठीक ह्याच जागेवर भेटूं, रजिस्ट्रेशन ऑफ़िसमधे जाऊं आणि तेव्हां अगदी पक्कं लग्न
करूं, पण आत्ता, आपल्याला जावं लागेल – घरी जाऊं या.”
“अगदी
असेंच?” तान्याने विचारलं.
“असेच,” मी ठामपणे उत्तर दिलं,
कारण आता थण्डीबरोबर भूक सुद्धां
लागली होती.
“जाऊ
दे, हे काही ठीक नाहीं झालं,”
तान्याने उत्तर दिलं. “एक ताससुद्धां
एकमेकांसोबत नाही घालवला...” आणि तिला पट्कन राग आल्यासारखं वाटलं, पण
तिने लगेच स्वतःला सावरलं:
“तसं, तू
बरोबरंच म्हणतोय, शंकाच नाहीं. पण तेरा वर्षांने – एक्ज़ेक्ट्ली? अगदी
ह्याच जागेवर?”
“शिलेदाराचे प्रॉमिस,”
माझ्या तोंडातून निघून गेलं, आणि
मला माहीतसुद्धां नव्हतं की ‘शिलेदार’ म्हणजे कोण असतात...
वादळ
अजूनही तसंच बेफाम होतं, आणि आम्ही, अगदी ओले चिंब आणि प्रसन्न मनाने आपआपल्या घराकडे
निघालो. आणि जेव्हां मी आपल्या क्वार्टरची घण्टी वाजवली, तर
क्षणभरासाठी मला भिती वाटून गेली: मी तर बरोब्बर तेरा वर्षांने त्या ठिकाणी
पोहोचून जाईन, जिथे आम्ही आत्ता गेलो होतो – मी प्रॉमिस पण केलं आहे, पण
जर येवढ्यां वर्षांत तान्या सगळं विसरून गेली तर?...
पण
मी लगेच ह्याबद्दल विचार करणं बंद केलं,
कारण मम्माने दार उघडलं आणि सांगितलं
की तिच्या जवळ माझ्यासाठी एक सरप्राइज़ आहे: तिने माझ्यासाठी टॉय-ट्रेन विकत आणली
आहे, मी कित्ती दिवसापासून ह्या टॉय-ट्रेनचे स्वप्नं पाहत
होतो. हो, आणि तान्यासुद्धां काहीच विसरणार नाही! तिने आतापर्यंत
एकदा तरी मला धोका दिला आहे कां? नाही. म्हणजेच,
आमच्या मीटिंगबद्दल काळजी करण्यांची
काही गरज नाहीये!
लवकरंच
ऑगस्ट येणारेय....
हा आहे रस्ता. दूर एक घर
आहे,
जिथे पूर्वी म्हातारा मेंढपाळ राहायचा. नेहमी आपल्या शेळ्यांना घेऊन
टेकडीवर जायचा. त्यांना तो कुठे ठेवंत असे (जवळ जवळ पंधरा शेळ्या होत्या त्याच्याकडे,
त्यांपेक्षा कमी तर नाहीच) – हे मला कधीच समजलं नाही. रस्ता
संपल्यावर झाडांचा मळा लागेल. तिथे पहाडी-बदामाची झाडं आहेत. पण जसे सध्यां आहेत,
अगदी तसेच फक्त हिरवे, टणक, आंबट बदाम होते. कदाचित् जंगली-बदाम असतील आणि त्यांना खायचं नसतं?
पूर्वी मला असं वाटायचं की हे खरे बदाम आहेत कारण मळा म्हणजे जंगलंच
असतो नं, भले ही छोटं का नसो; पण ते
बदाम कधी पिकलेच नाही, म्हणून मी त्यांना कधी खाल्लं नाहीं.
एकदा फक्त चव बघितली होती, म्हणून मला माहितीये की – आंबट
आहेत.
आजीला चांगलंच आठवतं की
युद्धांपूर्वी काय काय होतं, पण माझं लहानपण, ज्याच्यासाठी मला आजी खूप-खूप आवडते, ते तिला आठवतंच
नाही आणि ती मम्माच्या, मावशीच्या, बहिणीच्या
बालपणाशी गफ़लत करून टाकते. तिच्या डोक्यांत सगळं गड्ड्मड्ड झालं आहे, तिला फक्त एकंच संध्याकाळ आठवते, जेव्हां त्यांच्या
घरी डान्ससाठी कुरळ्या केसांचा एक तरूण आला होता आणि त्याने आजीला डान्ससाठी
बोलावले होते. अट्ठावीस वर्षानंतर तो माझा आजोबा होईल, पण
सध्यां तर मला त्याचाशी कसलंच घेणंदेणं नाहीये. आजीला आपलं शहर आठवतं, त्याचं शहर पण आठवतं, मैत्रिणी आठवतांत, स्टेशन ग्लत्कोव्का आठवतं, जिथे युद्धाच्या मोर्चावर
न गेलेल्यांना कराचेवो गावांतून काढून नेलं होतं, आणि तिला
हे सुद्धां माहीत नाहीये की आता – सोवियत संघ नावाचा देशही नाहीये, तिला तर अजून त्या कुरळ्या केसांच्या तरूणाबरोबर डान्स करायचा आहे,
पण अश्या प्रकारे करायचा आहे की पाव्लिकला राग नाहीं येणार, तो हेवा नाहीं करणार...
मृत्युची
आजीला भीति नाहीं वाटंत. कदाचित् तिने त्याबद्दल कधी गंभीरतेने विचारंच केला नसावा, पण
आजोबा गेल्या नंतर, जणु काही ती मृत्युची थोडी-थोडी वाट पहातेय. जे काही इथे आहे, मनोरंजक
आहे, - पण आता तिला ह्याचं काहींच महत्व नाहीये. डान्सेस, गाणं
‘स्टालिन – आमच्या सैन्याची शान, स्टालिन – आमच्या तरुणाईची उड्डाण’, जे त्यांच्या कम्सोमोल-ग्रुप मधे म्हणायचे, पाव्लिक, तूलाच्या
जिंजरब्रेडच्या डब्यांत ठेवलेली पत्रं – ह्यांच्या आठवणीतंच ती जगतेय. मला हे
समजतं आणि मी आजीवर आणखी जास्त प्रेम करतो. ती मला खेळण्यासाठी बाहेर जाऊं द्यायला
तयार आहे.
मला
ह्याचाशी काही घेणंदेणं नाही, की दीम्का, ज्याच्या निळ्या रंगाच्या दारावर किल्लीने खरवडून ‘सुपर
क्लब’ लिहिलं होतं,
तो अकराव्या वर्षी घरी बसला. कदाचित्
एखाद्या गंभीर कारणामुळे घरी बसला असेल,
पण ह्याने मला काहीच फरंक पडत नाही, मला
तो खूप आवडतो. दीम्का खरोखरंच ‘सुपर’ होता, सायकलच्या ‘स्पोक्स’ने ‘गन्स’ बनवायचा आणि एका मुक्क्यांत दोन बरगड्या बाहेर
काढायचा. त्यानी शाळा सोडली तरी काही हरकत नाही. त्याने सनकी रूस्ल्यापासून मला
वाचवलं होतं. रूस्ल्या म्हणंत होता की मी अनवाणी पायांनी सिमेन्टमधे ‘स्टेच्यू’ व्हावं, मी
पण झालो असतो स्टेच्यू , मी रूस्ल्याला घाबरंत होतो. पण दीम्का तिकडून जात होता, दीम्काच्या
झापंड बसल्यावर रूस्ल्या स्वतःच त्या पातळ सिमेन्टमधे उडून पडला, आपलं
घाणेरडं थोबाड घेऊन चिक्कट वस्तूत पडला आणि त्याला इतकं अपमानित झाल्यासारखं वाटलं
की स्वतःच्याच थुंकीने तो गुदमरून गेला. तेव्हां दीम्का ने मला चहा पाजला, केक
खाऊ घातला, टैक्सीत हिंडायला नेलं आणि बोलतां-बोलतां एकदम अचूक
सांगितलं की, बुशंच अमेरिकेचा प्रेसिडेन्ट होणार. तेव्हां रीगन होता, इलेक्शनला
तब्बल सहा महीने शिल्लक होते, पण दीम्काला आधीच सगळं माहीत होतं. म्हणजे, सगळे
लोक जसं म्हणायचे की त्याला टेलिपैथी येते,
ते बरोबरंच होतं. त्याच्या घरांत
साखर सुद्धां ब्राऊन रंगाची असायची, जळून गेली होती म्हणून नाही, पण
अशासाठी की ती आफ्रिकेतली होती; आता मला पक्कं माहीत आहे की दीम्कावर विश्वास
ठेवायलांच हवा.
उन्हाळा
लवकरंच संपेल. आतां जुलैचे शेवटचे दिवस आहेत,
पण पायाखाली जमीन करकरू लागली आहे, एखादी
लालसर, कडक वस्तु जीवनांत प्रवेश करूं पाहतेय. प्रत्येक
गोष्टीवर नजर ठेवली जाईल, आकाश जास्त दाट होईल,
जुलैमधला तो भास लुप्त होऊन जाईल की
आम्हीं सगळे एखाद्या पारदर्शी प्लैस्टिकच्या पैकेटमधे आहोत. आणि अचानक कळेल की
+18डिग्री – म्हणजे खूपंच गरम आहे आणि आम्हीं उगीचंच उन्हाळ्यांच्या पावसावर चिडंत
होतो.
दुकानांत
जाईन. कलिंगड विकत घेईन, आजी बरोबर खाईन. हे इथे,
लाकडाचं छोटसं शहर आणि तम्बू असायचा.
इथेच मुहनने एका गोड-गोड मुलीला ‘किस’ केलं होतं. मुहन तेव्हां किती वर्षांचा असेल? नक्कीच, मी
सध्यां जितक्या वर्षांचा आहे, त्याच्यापेक्षा कमीच असेल. पण मी तर आजपर्यंत अश्या
सुंदर मुलींना ‘किस’ नाही केलंय. त्यांना मुहन कां आवडायचां? तो
तर काही बोलंतच नसे, फक्त गंभीरपणे बघंत राही,
वाइनचे घोट घ्यायचा, खरंच, सुदृढंच
होता, बिनबाह्यांचा शर्त घालायचा,
त्याचे ‘मसल्स’ मुश्किलीने बाह्यांच्या ‘कट्स’मधून जायचे. दिवसां मुहनला लाकडाचा भुसा करण्याच्या
मशीनीवर काम करावं लागे, पण तो काम सोडून पळून यायचा आणि आमच्याबरोबर फुटबॉल
खेळायचा.
शिव्यातर
अश्या द्यायचा की जमीन थरथरून जायची, पण असं जाणवंत होतं की तो चांगला माणूस आहे. कदाचित्
असल्या ‘मसल्स’वाल्यासाठी चांगला माणूस होणं कठीण नाहीये, कारण
की सगळंच तुमच्या हातांत असतं! आणि, जर असंच आहे,
तर मग शेखी कां मारायची?
मिलिट्री-स्टोअर
पर्यंत आलो. इथे जाड्या अंद्रेइ राहायचा. सगळ्या बसेसचे ड्राइवर्स त्याला आपल्या कैबिनमधे
बसवायचे आणि मोठमोठ्याने, आणि अकड दाखवंत बोलायचे,
आणि नंतर जाड्या अंद्रेइसुद्धां
बसमधे काम करूं लागला. सगळेजणं त्याला ‘डोनट’ म्हणायचे. एकदां ल्योशा खाएत्स्की गिटार घेऊन आला आणि
मी विक्टर ज़ोयचे ‘व्हाइट स्नो’
हे गाणं वाजवलं. ‘डोनट’ पट्कन
घरी पळाला आणि रॉक ग्रुप ‘किनो’बद्दल एक काळं,
फाटकं पुस्तक आणून माझ्या हातांत
ठेवलं. आणि, दोन महिन्यांनी,
जेव्हां माझ्यासाठी गुलाबी थण्डीसाठी
निळं जैकेट विकत घेतलं, तेव्हां मी आपलं जुनं,
चामड्याचं जैकेट, जे
खरं म्हणजे, मला कधीच आवडलं नव्हतं,
“डोनट’ला देऊं लागलो. पण त्याने ते घेतलं नाही. म्हणाला की
त्याला खूप गडतं. कमाल आहे, जैकेट फक्त चामड्याचं आहे,
पण आहे तर साधारण जैकेट्स सारखंच नं.
पण अंद्रेइ ने नाहींच घेतलं. मी ते जैकेट कुणाला तरी देऊन टाकलं, आठवंत
नाही, कुणाला.
कलिंगड
विकत घेतलं. चंद्राच्या प्रकाशांत टेकड्या दिसताहेत. आणि खड्डेसुद्धां. आमच्या
प्रवेशद्वाराचे ‘कोड’ पुन्हां विसरलो ( आतांच बदललं आहे), किल्ल्या
जवळ नाहींत, फोन करून आजीला उठवीन.
आणि
टाइम, बाप रे! बारा वाजून गेलेत!
एकदम
मेंढपाळ आला तर? मी कल्पना करतोय की तो जागा आहे: तो चालला आहे, बेलोमोरीनचे
(सिगरेटचे एक लोकप्रिय ब्राण्ड) कश घेतोय,
जमीन करकर करतेय, जुन्या
काळाला आठवतोय, पण त्याला कोणीच त्या काळाबद्दल विचारंत नाही, म्हातारासुद्धां
चुपचापच असतो. पण नाही, नाही. पण रस्त्यावर कोणीच नाहीये. फक्त वेळेचं भान न
ठेवणारा, फार्मवरून परत येणारा माणूस कारचे दूरचे लाइट्स लावतोय
आणि खूष आहे, की तो बस शहरांत पोहोचण्यांतच आहे. आंबट बदामांच्या
मळ्यावर प्रकाशाचा झोत टाकून तो हाइवेवर निघून जातो. तिथे कच्चा रस्ता नाहीये, काही
दिवसांपूर्वी टाकलेला सपाट, बिनखड्ड्यांचा रस्ता आहे. सुंदर...
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें