ते सोनेरी दिवस...
ही त्या जुन्या काळांतली गोष्ट आहे, जेव्हां
टी.वी. वर नुकतीच फ़ैन्टेसी फिल्म “भविष्य काळांतून आलेले पाहुणे’ दाखवण्यांत
आली होती आणि सगळी मुलं स्पेस-पाइरेट्स आणि रोबो वेर्तेरचा खेळ खेळायची. मुलांना
फिल्मच्या हीरोइन एलिस सिलेज़्न्योवाशी प्रेमंच झाले होते आणि मुलींना – फिल्मच्या
मुख्य हीरो कोल्या गेरासीमोवशी...
वोवेत्स मला नऊमज़ली बिल्डिंगची वेल्क्रो नाहीं काढूं
देत, आणि त्याला वाटतं की ज़र मी वेल्क्रो काढून टाकीन तर
त्याला हिवाळ्यांत थण्डी वाज़ेल. पण मी तर फार पूर्वीपासूनच वेल्क्रोला हात देखील
लावंत नाही आणि वोवेत्स माझा मित्र आहे.
काही दिवसांपूर्वी आम्ही बेंचवर बसलो होतो, आणि
तो म्हणंत होता:
“कळंत नाहीये की मला मॉस्कोला जायला पाहिजे किंवा
नाही.”
“तुला कशाला जायचं आहे मॉस्कोला?” मी विचारतो. वोवेत्स आपल्या पैन्टच्या फाटक्या
खिशांतून अनेक वेळां दुरुस्त केलेला बटवा काढतो,
ज्यांत कद्धी एकही पैसा नसतो, आणि
मला पॉलिथीनच्या मागे घुसवलेला एक छोटा सा फोटो दाखवतो.
“हिच्याकडे,”
तो म्हणतो.
मला एक ओळखीचा चेहरा दिसतो,
पण लक्षांत येत नाही की ही कोण आहे.
“कोण आहे ही?”
मी विचारतो.
पण वोवेत्स माझ्याकडे अश्याकाही नजरेने बघतो, की
मला लगेच आठवतं.
“-आ-आ! हिनेच तर ‘भविष्य काळांतून आलेले पाहुणे’ मधे
एलिसचा रोल केला होता! तू, काय, तिला ओळखतोस?!
असं वाटतं, की
चांगलीच आहे, वोवेत्स!”
“माझी
गर्ल फ्रेण्ड आहे,” वोवेत्स गंभीरतेनं सांगतो.
“ओह, नो, असं असूंच शकत नाही!”
आश्चर्यामुळे
मी हळू-हळू गवतांवर लैण्ड करायला लागतो. एलिस – वोवेत्सची गर्ल फ्रेण्ड!
“तू तिला
कसा काय भेटलास?” मी विचारतो.
“मी नाही, ती मला भेटली. मॉस्कोत, फेस्टिवलमधे. ती माझ्याजवंळ
आली आणि – बस, आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली.”
मला
वोवेत्सचा इतका हेवा वाटायला लागला! पण मला सुद्धां एलिस खूपंच आवडते!
“आणि तू,” मी म्हणतो,
“अजूनसुद्धां विचारंच करतोय, की तुला जायला
पाहिजे किंवा नाही?!”
“हो, माहित आहे.” वोवेत्सने बटवा परत खिशांत ठेवला. “कदाचित्, ती स्वतःच येईल, बस, मला येवढंच
नाही माहीत की केव्हां येईल...मला भेटायची खूप इच्छा आहे तिला.”
घरी
आल्यावर मी आजीला सगळी माहिती देतो, की फिल्म ‘भविष्यांतून आलेले पाहुणे’ ह्या फिल्मच्या एलिसचे नऊ
मजली बिल्डिंगच्या वोवेत्सशी प्रेम झाले आहे आणि ती लवकरंच त्याच्याकडे येणार आहे!
“त्या वोवेत्सशी,” आजीने विचारलं, “ज्याचे ओठ जाडे-जाडे आहेत?”
“आता इथे
जाड्या ओठांचं काय काम आहे!” मी विचारतो. त्याने मला आत्तांच एलिसचा फोटो दाखवला
आहे!”
पण आजी हसायलांच
लागली:
“बस, येवढंच उरलं होतं! एलिस आमच्या जाड्या-जाड्या ओठांच्या वोवेत्सला मिठी
मारेल! तिला दुसरं कोणी नाही भेटलं!”
‘हसूं दे, हसूं दे’, मी विचार
करतो. ‘पण एलिस नक्केच येईल वोवेत्सला भेटायला! तसं, म्हणजे, मला सुद्धां हेवा वाटंत होता. वोवेत्सच्या
जोड्यांना लेसेस देखील नसतांत. ते कोणच्या तरी ताराने बांधलेले असतात. आणि एलिसला
आठ भाषा येतात! ती प्लूटोवर सुद्धां जाऊन आलीयं. तिने स्पूत्निक लांच केलेलं आहे,
जे सगळ्यां आकाशगंगांमधे उडतं आहे आणि पृथ्वीवर सिग्नल्स पाठवतंय.
मी
आणि वोवेत्स फोटो प्रिन्ट करतो...
सन्
1988मधे मी फोटोग्राफी शिकलो. ही, म्हणजे, फार कमालीची गोष्ट होती, पण ह्यांत काही अडचणी
होत्या. मुख्य म्हणजे, त्या काळांत असे फोटो स्टूडियोज़
नव्हते, जे फ्लैशच्या मदतीने एका सेकंदांत फोटो प्रिन्ट करून
देतील, दूर-दूर पर्यंत नव्हते. फोटोग्राफ़ बनविण्यासाठी गरज
होती फोटो-एनलार्जरची, लाल लैम्पची, रील
मधली फिल्म बघण्यासाठी एका बेसिनची, फिक्सरची, डेवेलपरची, फोटोग्राफिक पेपर वगैरे वगैरेची...हे
सगळं करण्यासाठी सर्वांत जास्त गरज होती – टाइमची. एनलार्जर सोडून माझ्याकडे बाकी
सगळं होतं, पण एनलार्जरशिवाय कामंच चालणार नव्हतं, आणि तो खूप महागडासुद्धां होता. मम्मा-पापाने प्रॉमिस केलं होतं की मला
एनलार्जर घेऊन देतील, पण न्यू-इयरला, आणि
आत्तांतर फक्त मे महिना चालू होता. वाट बघणं शक्य नव्हतं, आणि
जर माझा मित्र वोवेत्स नसतां तर काहीही होऊं शकलं नसतं.
“चल, माझ्या घरी फोटो प्रिन्ट करूं कां?” एकदा वोवेत्सने
मला म्हटलं. “माझ्याकडे सगळं आहे आणि डेवेलपर सुद्धां आहे...”
सुरुवातीला
माझा वोवेत्सच्या बोलण्यावर बिल्कुल विश्वास नाही बसला. चला, तुम्हांला सांगूनंच टाकतो की माझा हा मित्र खूपंच विचित्र आहे. म्हणजे असं,
की काही दिवसांपूर्वी तो म्हणाला होता, की ‘भविष्यातून आलेले पाहुणे’ची एलिस – त्याची गर्ल
फ्रेन्ड आहे. आणि हिवाळ्याच्या दिवसांत त्याने मला आपल्या नऊ मज़ली बिल्डिंगचे
वेल्क्रो काढायला मनाही केली होती, कारण की वेल्क्रो नसेल तर
त्याला हिवाळ्यांत खूप थण्डी वाजेल, कारण की तो पहिल्या
मज़ल्यावर राहतो आणि वेल्क्रोचा बरांचसा भाग त्याच्याच बाल्कनीखाली आहे. आणि असंही,
की वोवेत्स आपले जोडे लेसेसच्या ऐवजी निळ्या ताराने बांधतो.
वोवेत्सने कित्येकदां असं पण सांगितलं होतं की शहराच्या एका शाळेत कुंग-फू शिकवतो,
तो कुंग-फूचा ‘पोचलेला मास्टर’ आहे, कारण अगदी लहानपणी तो चीनमधे शिकंत होता,
जेव्हां, म्हणजे, अगदी
खूपच लहान होता. ह्या गोष्टीने पण मनांत शंका यायची, कारण,
एकदा आमच्या कन्स्ट्रक्शन साइटवर मोठी, बदमाश
मुलं एकदम आमच्या समोर आली, मी काही मास्टर-बिस्टर नसतांना
देखील त्यांच्याशी फाइट करणार होतो, पण वोवेत्स पळून गेला.
परिस्थितिकडे बघून तो पट्कन तिथून पसार झाला, आपले तळपाय
दाखवंत, ज्याने त्याचे अवाढव्य शरीर थलथल हलंत होतं.
म्हणजेच, विचित्रंच होता माझा मित्र, त्याच्याबद्दल काहीही
सांगणं शक्य नाही...त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं, आणि
मी विचारलं:
“ तू
फेकत तर नाहीये ना? खरंच डेवेलपर आहे तुझ्याकडे?”
“आई
शप्पथ. प्रॉमिस.”
“तर, फोटो केव्हां प्रिन्ट करायचे?”
“बघ, वाटलं तर उद्या
सकाळी ये माझ्याकडे, नऊ वाजतां, रील्स,
फोटो-पेपर घेऊन ये, आणि बस, प्रिन्ट करून टाकूं.”
“ओके, नक्की!” मला खूप आनंद झाला आणि सकाळी-सकाळी मी निघालो वोवेत्सकडे, रील्स आणि फोटो-पेपर घेऊन.
तो
शेजारच्या नऊमजली बिल्डिंगच्या दोन नं.च्या विंगच्या पहिल्या मजल्यावर राह्यचा, आणि मी हसंत-नाचंत त्याच्याकडे चाललो होतो – कारण की माझ्या साधारण कैमरा –
‘स्मेना’ने काढलेले सगळे फोटो आता
खरोखरंचे फोटोज़ होणार होते.
“ये,” वोवेत्सने दार उघडलं. “फक्त येवढं कर, की कोणच्याही गोष्टीवर
हैराण नको होऊ आणि वेडे-वाकडे प्रश्न नको विचारूं. प्रिन्टिंगचे काम बाथरूममधे
करू. लाल लैम्प आहे, तर तू जराही काळजी करूं नकोस, सगळं व्यवस्थित होईल.”
पण
कोणच्याही गोष्टीवर हैराण न होणं फार कठीण होतं. असं नव्हतं की वोवेत्सच्या
क्वार्टरमधे सगळं अव्यवस्थित होतं, फक्त सगळ्या
वस्तु इतक्या अस्तव्यस्त होत्या की असं वाटंत होतं जणु काही प्रत्येक खोलीत,
कॉरीडोरमधे आणि किचनमधे अनेक शहीद-मृतात्मा घुसल्या आहेत. पलंगांना आणि दिवाणांना पायंच नव्हते. आणि प्रत्येक खोलीत (सगळे मिळून
दोनंच खोल्या होत्या) ह्या आनंदी वातावरणांत एक-एक काळं मांजर बसलं होतं.
“दोघांच्या
अंगावर पिसू आहे,” वोवेत्सने आधीच सांगून टाकलं.
खूपंच विचित्र वाटंत होतं. माझं मन मला सांगत
होतं की ह्या क्वार्टरमधे कांहीही होऊं शकतं. आजूबाजूची प्रत्येक वस्तु जशी एका
धोकादायक उत्तेजनेने काठोकाठ भरलेली वाटंत होती. थोडा वेळ मी विसरूनंच गेलो की मी
इथे कशासाठी आलोय. “काही खायचंय?” वोवेत्सने विचारलं.
“नाहीं!”
मी जवळ-जवळ किंचाळलोच. त्याच्या घरी कशा प्रकारचे जेवण असेल, ते फक्त देवालांच माहीत, आणि तसे पण एक सुद्धा माणूस
ह्या घरांत काही खाण्या-पिण्याची रिस्क नाही घेणार. “नाहीं,” मी पुन्हां सांगितले, “चल, फोटोग्राफ्स
प्रिन्ट करूंया.”
“चल, चल,” माहीत नाही वोवेत्स कशाला हसला.
“तू
इथल्या घाणीकडे लक्ष नको देऊं, माझ्याकडे नेहमीच असं असतं.
लहान-सहान गोष्टींवर मी आपलं डोकं नाही पिकवंत.
आता मला आठवलं
: वोवेत्सने एकदा मला सांगितलं होतं की, जणु त्याच्याकडे
बैंकेत पंधरा हज़ार पडले आहेत, आणि मी विचारले:
“तुझ्याकडे
तर बैंकेत पंधरा हज़ार पडलेत नं, पण सगळे पलंग तर बिन पायांचे
आहेत?”
“असंच असलं पाहिजे,” वोवेत्सने गूढपणे उत्तर दिलं.
“तू काय पलंग बघायला आला आहेस?”
मला
वाटलं की तो बरोबर बोलतो आहे आणि खूप झालं आजूबाजूच्या वस्तूंवर लक्ष देणं, आता मला कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे.
पण हे
काम झालं कसं – ही एक वेगळीच गोष्ट आहे!
जेव्हां
आम्हीं बाथरूममधे गेलो आणि काही बेसिन्स आणि केरसुण्यांच्यामधून, ज्या वोवेत्सला खूप प्रिय होत्या, लाल बल्ब लावून
बाकीचे बल्ब्स बंद करून टाकले, तेव्हां माझा मित्रं एकदम खूप
खूष झाला. असं साधारणपणे होत नव्हतं आणि म्हणूनंच, हे चांगलं
लक्षण नव्हतं.
“कुंग-फू
दाखवूं?”
डोळे मिचकावंत वोवेत्सने विचारलं.
“प्लीज़, पुढच्या वेळेस?” मी सतर्कतेने म्हटलं, तसं मला माहीत होतं की मी काहीही म्हटलं तरी कुंग-फू नक्कीच होईल. वोवेत्स
स्टैण्डवर उभा राहिला, टबजवळ पडलेल्या एका रिकाम्या बेसिनला
उलटं ठेवून (वोवेत्सच्या क्वार्टरमधे कमोड आणि बाथ एकत्रं आहेत).
“वोवेत्स, गरंज नाहींये!” मी ओरडलो.
“मी-ई-ई!!!”
वोवेत्सने एका बाजूला लात घुमवली, आणि फिक्सर्ससकट बेसिन
बाथरूमच्या फरशीवर लोळूं लागला.
“ईडियट!” मी गरजलो. “हे काय केलंस तू?!”
वोवेत्स गंभीर झाला.
“किंचाळू नकोस,” त्याने
शांतपणे म्हटले आणि थोडं थांबून, जेव्हां त्याच्या चेहरा किंचित
कसानुसा झाला, तो पुढे म्हणाला: “तू आयुष्यांत कितीदां फोटो
प्रिन्ट केले आहेत?”
“ही दुसरी वेळ आहे,” मी प्रामाणिकपणे स्वीकार केलं.
“म्हणूनंच. आणि मी पाच
हजार वेळां करून चुकलो आहे,” वोवेत्सने फुशारकी मारंत म्हटले.
“असं होतं कधी-कधी, कि बाय-चान्स फिक्सर पडतो. तो इतका ज़रूरी
नाहीये. डेवेलपर तर आहे नं!”
तरी पण मला राग येतंच होता, कारण मला आता वाईट वाटंत होतं, की मी वोवेत्सच्या
घरी कां आलो, पण मग लौकरंच आम्ही सरळ कामाला लागलो.
सात मिनिटं तर सर्व काही
व्यवस्थित चाललं. पाच फोटोज़ जवळ-जवळ तयार होते, फक्त त्यांना वाळवणं
शिल्लक होतं, पण मग असं काही घडलं, जे
मला सांगितलंच पाहिजे. वोवेत्सने फरशीवरून धुळीने माखलेली एक वस्तु उचलली आणि
किंचाळला: “जाऊं नाही देणार! तुला कसंही करून मारूनंच टाकीन! एक पण रास्कल येथून
जाऊं शकणार नाही!” तो कोणत्यातरी घाणीवरून धूळ हटवण्यासाठी बाथरूमच्या फरशीवर पाणी
ओतूं लागला.
“तू काय करतोयंस?” मी अगदी रडवेला झालो.
“झुरंळं, तुला दिसंत नाहीये कां?! झु-ऊ-र-अ-ळ!”
आणि तो धूळ झाडंत राह्यला.
मी तीरासारखा बाथरूममधून
बाहेर पळालो, कारण मी अगदी पस्त झालो होतो. तिथे एक मिनिट
आरडा-ओरडा चालू होता, मग वोवेत्स प्रकट झाला आणि जणु काही
झालंच नाही, अश्या थाटांत म्हणाला:
“मास्क घालून फोटोग्राफ्स
प्रिन्ट करूं. हे लिक्विड धोकादायक आहे.”
मी, काय माहीत कसा, तयार झालो. वोवेत्सने खोलीतूंन दोन
हिरवे मास्क्स खेचंत आणले आणि आम्ही पुन्हां बाथरूममधे घुसलो. मास्क्स घातल्यामुळे
श्वास घ्यायला त्रास होत होता, पण अजूनही फोटो प्रिन्ट
करायची इच्छा शिल्लक होती.
बोलणंसुद्धा अशक्य होतं.
प्रचण्ड दमट होती. पण तरीही काही नवीन फोटोग्राफ़्स प्रिन्ट झाले होते...
मे चा महिना, बाहेर ऊन आणि ऊब होती. मुलं सायकल चालवतायेत. निकोलाएव स्ट्रीटवर जुन्या
नऊमजली इमारतीच्या घाणेरड्या क्वार्टरमधे, पहिल्या मजल्यावर,
बाथरूममधे, लाल लाइटच्या प्रकाशांत आणि
डब्यांच्या, बेसिन्सच्या, केरसुण्यांच्या आणि मॉपर्सच्या गराड्यांत, दाटीने आणि खूपंच त्रास सहन करंत, मास्क घालून दोन
मुलं बसली आहेत आणि फोटोग्राफ़्स प्रिन्ट करताहेत. मूर्खपणा आहे. असं तर
चार्म्सच्या गोष्टींत सुद्धां नसतं...
“मास्क काढून टाक, मी गम्मत करंत होतो,” कावेबाजपणाने आणि निर्ल्लजतेने
वोवेत्स हसला, जेव्हां त्याला कळलं की माझा दम घुटतोय.
“गम्मत करंत होतो
ह्याचा अर्थ काय?” मी मास्क काढून विचारलं.
“अरे, मी साधंच पाणी ओतलं होतं, फक्त बरेच दिवसांत कोणाची
फिरकी घेतली नव्हती. रविवारी ये, छान
प्रिन्ट्स काढूं. मम्मा-पापा घरी असतील, त्यांच्यासमोर मी
कुंग-फू, बिंग-फू नाही दाखवंत आणि मास्क आणण्याची पण मला
परवानगी नाहीये, त्यांची रजिस्टरमधे नोंद आहे.”
“डेविल!” मी किंचाळलो.
“आणि तुझं नाव काय बाइ चान्स पागलांच्या डॉक्टरच्या रजिस्टरमधे नाही नोंदवलंय?!!”
“प्लीज़, गुण्डागर्दी नाहीं! तू पाहुणा आहेस म्हणून मी तुला उत्तर देऊं शकंत नाही,
पण जर एखादी गोष्ट आवडली नसेल तर पळ इथून.”
दात घट्ट मिटंत आणि काहीही
न बोलता,
मी आपल्या रील्स उचलल्या आणि तीस सेकंदांत बाहेर निघून आलो.
खूप वैताग आला होता.
थैंक्स गॉड, संध्याकाळी पापा ऑफ़िसमधून परत आले, तेव्हां आम्हीं जीन-पॉल बेल्मोन्दोची फिल्म ‘अलोन’
बघायला गेलो. जीन-पॉल बेल्मोन्दो आम्हांला खूप आवडतो. तेव्हां मी
ठरवलं की आता फोटोग्राफ्स सुद्धां एकट्यानेच प्रिन्ट करायचे. आणि वोवेत्स – त्याला
मी ह्यापुढे कधीच भेटणार नाही...
एका आठवड्यानंतर मी
पुन्हां वोवेत्सशी कम्पाऊण्डमधे बोलूं लागलो आणि त्याने पुन्हां सिद्ध करून दाखवलं
की तो कुंग-फू मास्टर आहे. असेल कदाचित. ‘कदाचित कुँग-फूचे
सगळेच मास्टर्स मास्क घालूनंच फोटोग्राफ्स प्रिन्ट करंत असावेत आणि खोटं बोलत
असतील की त्यांची फिल्म-स्टार्सशी दोस्ती आहे?’ माझ्या
डोक्यांत विचार आला...
तर हे अशी होती ही गोष्ट.
ही कॉमेडी होती की ट्रेजेडी? तुम्हांला काय वाटतंय?
खरं सांगायचं म्हणजे मलाही
कळणार नाही!
मी परामनोवैज्ञानिक हीलर कसा झालो...
मी
पाचवीत असताना, टी.वी.वर जवळ-जवळ रोज सर्व प्रकारचे मैजिशियन्स, जादूगार
आणि परामनोवैज्ञानिक हीलर्स दाखवायचे. ते कोणत्याही प्रकारचा आजार बरा करायचे.
फक्त हात हलवायचे, किंवा शब्दांने काही सूचना द्यायचे, आणी
तुमचा आजार एकदम गायब! तुमचा त्यांच्यावर विश्वास नसला तरीही. विशेषकरून दोन ‘हीलर्स’ नेहमी
दाखवायचे – कश्पीरोव्स्की आणि चुमाक. चुमाकचे केस पांढरे होते आणि त्याचा
प्रोग्राम सकाळी असायचा, तो फक्त हवेंत हात हलवायचा
( क्रीम ‘चार्ज’ करायचा, पाणी – म्हणजे असं की जे पण काही तुम्हीं टी.वी.जवळ
ठेवलं असेल, ते ‘चार्ज’ करायचा), आणि कश्पीरोव्स्की संध्याकाळी ‘हील’ करायचा, त्याचे केस काळे होते आणि तो बोलून सूचना द्यायचा.
मी
त्यांना बघितलं आणि माझ्या मनांत विचार आला की मी त्यांच्यासारखा ‘हीलर’ कां
नाही होऊं शकंत? ते सुद्धां कधी काली शाळेतंच शिकायचे आणि आपल्या
योग्यतेबद्दल तेव्हां त्यांना काहीही माहीत नव्हतं. आमच्या शाळेंत दर शुक्रवारी ‘क्लास-एक्टिविटी’ होत
असे. मी ठरवलं की ह्या शुक्रवारी मी ‘शो’ करीन. माशा मलोतिलोवाला पण कळेल की मी काही साधारण
मुलगा नाहीये, खरोखरचा ‘हीलर’ आहे. माशा मलोतिलोवा आमच्या क्लासमधे सगळ्यांत छान
मुलगी आहे, पण, सध्यां, ह्याबद्दल काहीच नाही सांगणार.
मी
आपल्या क्लास-टीचरकडे, ल्युदमिला मिखाइलोव्नाकडे गेलो आणि तिला सांगितलं की
अशी-अशी गोष्ट आहे, मी शुक्रवारी एक्टिविटी-टाइममधे हीलिंग शो करूं शकतो
कां? आधी तर ती हसली,
मग तिने विचारलं की हा ‘हीलिंग’चा
गुण माझ्यांत पूर्वीपासूनच आहे कां, आणि मग तिने परवानगी दिली. मला, देवा
शप्पथ, खोटं बोलावं लागलं,
की मी साधारण सहा महिन्यापासून पाणी ‘चार्ज’ करतोय
आणि मी माझ्या काकांचा अल्सर बरा केला होता.
गुरूवारी, जेव्हां
‘शो’ साठी फक्त एकंच दिवस शिल्लक राहिला होता, मी
विचार केला की थोडीशी ‘रिहर्सल’ करावी. मी कैसेट-प्लेयर समोर बसलो आणि, अशी
कल्पना करूं लागलो की माझ्या शरीरातून स्ट्राँग-पॉज़िटिव एनर्जी निघते आहे. मी
आपल्यासमोर हातांना हलवंत म्हणूं लागलो:
“डोळे
बंद करा,” मी म्हटलं. “तुम्हाला एक मोट्ठी पांढरी खोली दिसतेय, जी
प्रकाशाने तुडुम्ब भरली आहे. तुम्हीं खोलीत आहांत. तुम्हीं खोलीच्या मधोमध आहे.
तुम्ही बाजूला उभे राहून स्वतःला बघताय,
तुम्हीं जणु काचेचे बनले आहात.
पांढरा, भारहीन प्रकाश तुमच्या शरीराला ऊब देत आहे. मंद-मंद
वारं वाहतंय. शरीराच्या ज्या भागांत जडपणा आहे,
तेथे जास्त प्रकाश एकत्रित होत आहे
आणि जडपणा निघून जातोय. तुम्हांला बरं वाटतंय.
तुम्हांला ऊब जाणवतेय.”
मी
हातांना आणखी थोडा ताण दिला, त्यांना झटकलं आणि म्हणंत राहिलो:
“वारं
मंद होतंय. तुम्हांला मुश्किलीने त्याची जाणीव होतेय. तुम्हांला ह्या स्थितीत शक्य
असेल तितका जास्त वेळ रहावसं वाटतंय. पण प्रकाश विखरूं लागतोय. तो लुप्त होतो, आणि
स्वतःबरोबर तुमचे सगळे कष्ट घेऊन जातोय. तुमचं शरीर शांत आहे आणि स्वच्छ आहे...”
मी
जवळ-जवळ अर्धा तास बोलतंच होतो, दारावरची बेल वाजेपर्यंत. शेजारचा मक्सिम मला बोलवायला
आला होता. आम्हांला हिंडायला जायचं होतं,
पण मी म्हटलं की आत्ता मी येऊं शकत
नाही, मी त्याला खेचंत माझ्या खोलीत आणलं, त्याला
समजावलं की मी काय करतोय, आणि त्याच्यासमोर ‘शो’चा टेप रेकॉर्डर ठेवला.
मक्सिमने
एखाद्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे डोळे मिटले,
न हलतां पूर्ण कैसेट ऐकली आणि
म्हणाला:
“व्वा, तू
तर कश्-पी-र आहेस! त्याच्यापेक्षांसुद्धा जास्त स्मार्ट आहे! सुप्पर! अरे, मी
तुझ्याकडे आलो तेव्हां माझं डोकं दुखंत होतं,
पण आता – जणु काही हाथ फिरवून सगळं
दुःख काढून टाकलंय!”
मी
विचार केला, चला, सगळं ठीक आहे,
म्हणजे,
उद्या सगळं व्यवस्थित होईल.
शुक्रवारी
सगळ्या क्लासेसमधे मी फक्त एक्टिविटी-टाइमबद्दलंच विचार करंत होतो. माझ्या
वर्गमित्रांनी पहिला तास सुरू होण्यापूर्वीच पाण्याचे डबे आणि क्रीमच्या ट्यूब्स
दाखवल्या, ज्यांना चार्ज करायचं होतं,
आणि,
कालची रिहर्सल जरी चांगली झाली असली, तरी
मी खूप वैतागलेलो होतो. जेव्हां एक्टिविटी-टाइम सुरू झाला आणि ल्युदमिला
मिखाइलोव्नाने टीचरच्या टेबलामागची जागा मला दिली,
तेव्हां त्या डब्यांच्या आणि
क्रीमच्या ट्यूब्सच्या मागून मी जवळ-जवळ दिसतंच नव्हतो आणि माझं हृदय इतक्या
जोराने धडधडंत होतं, जणु काही त्याला वेड लागलंय.
“डोळे
बंद करा,” मी सुरुवात केली. “एक पांढरी मोट्ठी खोली आहे, तुम्हीं
त्या खोलीत आहे. तुम्हीं जणु काचेचे आहात. प्लीज़,
शांतता ठेवा...”
पहिली
गोष्ट, म्हणजे कोणालांच डोळे बंद करायचे नव्हते, आणि
दुसरी, मी कितीही जीव तोडून सांगत होतो, तरी
त्यांच्या हसण्याने माझ्यातल्या एनर्जीच्या प्रवाहांत अडथळा येत होता, सगळे
हसतंच होते आणि मला चिडवंत होते. मी त्या परिस्थितीतही ‘शो’ करंत
होते. जर सिर्योझा बोंदारेवने गडबड नसती केली,
तर सगळं नीट झालं असतं, पण
जेव्हां मी म्हटलं, की ‘तुमचं शरीर शांत आणि स्वच्छ आहे, आजार
काळ्या पदार्थाच्या रूपांत त्याला नेहमीसाठी सोडून जात आहे ’, तेव्हां सिर्योझा,
जो साधारणपणे एक शांत स्वभावाचा
मुलगा आहे, इतक्या जोराने खो-खो करंत हसूं लागला की शाळेची
बिल्डिंग बस पडायलांच झाली. सगळे त्याच्याबरोबर हसूं लागले. इतक्या जोराने हसू
लागले की खिडक्यांचा काचा थरथरू लागल्या. त्यांना वाटंत होतं की जगांत माझ्या ‘शो’पेक्षा
जास्त हास्यास्पद आणखी काहीच
नाहीये...ल्युदमिला मिखाइलोव्ना क्लासच्या दारांत उभी राहून माझ्याकडे
प्रेमाने बघंत होती, शेवटी मी सुद्धां हसू लागलो, पण
मग मी घोषणा केली, की काहीही
झालं असलं, तरी पाणी आणि क्रीम्स मात्र ‘चार्ज’ झालेले
आहेत.
म्हणजे
मला माहीत नाहीये की मी ‘हीलर’ आहे किंवा नाही. माझा ‘शो’ जरी फ्लॉप झाला असला,
तरी सोमवारी माशा मलोतिलोवाने
सांगितलं की तिची तब्येत आता पहिल्यापेक्षां बरी आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें